जिल्ह्यात होणार ९ लक्ष ९६ हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे वाटप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. ११ – भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी ९ लक्ष ९६ हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहचविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी नुकताच आढावा घेऊन सुचना दिल्या. श्री. कुंभेजकर म्हणाले, बी. एल. ओ. मार्फत‘मतदार माहिती चिठ्ठी’ लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठयांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते.त्यामुळे ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे नियमित वाटप करा. अधिकाºयांनीसुध्दा क्रॉस चेकिंग करून मतदारांपर्यंत माहिती चिठ्ठी पोहोचले की नाही, याची पडताळणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *