भारतीयांनी संविधाना प्रति एकनिष्ठ रहावे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील जिल्हा परिषद सभागृहात भारतीय संविधान दिन व संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून संबोधित करतांना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उद्गारले की, आपण मुलांना नागरीक शास्त्र नीट समजला की नाही, संविधानाची उद्देशिका वाचली गेली त्याचा अर्थबोध नीट घेतला जात आहे का? जगातील अनेक देशाचा अभ्यास करुन दूरदर्शी दृष्टिकोन ठेवून बाबासाहेबांनी देशाचा संविधान तयार केला. त्यामुळे देशात विविधता असतानाही संविधानामुळे एकता व अखंडतेला धोका नाही. मुलभूत अधिकार आहेत पण वाईट गोष्टी पसरविण्यापेक्षा चांगल्या गोष्टी साठीच्या कर्तव्याप्रती निष्ठा, लोकशाहीसाठी पूरक योगदान नागरिकांनी व कर्मचारी यांनी जोपासले पाहिजे असे विधान केले.

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव तथा न्यायाधिश बीजु गवारे म्हणाले की, संविधान सर्व समावेशक दिशादर्शक असून कायद्याने समानता नाकारता येत नाही. संविधानिक कायद्याचे पालन करून आदर्श नागरीक घडविणे शक्य आहे. आणि मुलभूत हक्क व अधिकार यासाठी सर्व व्याप्त आहे. भारतीय संविधानात राज्य नीती निर्देशक तत्वे नमुद अनेक कलम विषद करून सार्वभौम कायद्याने प्राप्त हक्क व अधिकार समजाऊन सांगीतले. कायद्याचे पालन करून समाजातील सर्व नागरिकांनी लोकतंत्र पुरक कार्य करावे असा संदेश दिला. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे भंडाराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब म्हणाले की, संविधान दिन साजरा करतांना संविधान सन्मान परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. संविधानातील प्रास्ताविकाचे वाचन करुनच होणार नाही तर आदर्श नागरीक म्हणून कर्तव्य व जबाबदारी ने कार्य करण्याची आवश्यकता आहे. स्पर्धासाठी नागरीक शास्त्र संविधातून शिकता येतो असे विचार व्यक्त केले. माजी न्यायाधीश भगवान रहाटे यांनी डॉ. आंबेडकर अ‍ॅड डेमोक्रशी यावर इंग्रजीतून व्याख्यान दिले. तर डॉ. मिलींद दहीवले यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटन संपूर्ण देशात संविधान सन्मान परीक्षा घेऊन जनजागृती करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले व सर्वांच्या अन्याया विरुद्धच्या कायदेशीर लढ्यात संघटना अग्रेसर असेल आता संघटना मोठी झाली असली तरीही अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चौफेर चे कलावंत प्रियदर्शी सोनटक्के यांनी नृत्य कला सादर करून सर्वांची मने जिंकली. महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘संविधान सन्मान प्रतियोगिता परिक्षा २०२३ घेण्यात आली. या परीक्षेत गुणानुक्रमे येणाºया विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी भंडारा, लातुर, चंद्रपूर जिल्हयाच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सहभागी शाळांच्या विद्यार्थ्यांसह, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह, संविधान व पुस्तके, वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्यातील छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व त्यांचे कोच यांचा गौरव करण्यात आला. या संविधान दिनी आयोजीत सत्कार समारंभी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन विधी सेवा प्राधिकरण भंडाराचे जिल्हा सचिव तथा न्यायाधिश बिजु गवारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उप मुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे परब हे होते. तर केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय चेअरमन तथा भारत सरकारच्या अल्पसंख्यांक आयोगाचे शांती समिती सदस्य, डॉ. मिलिंद दहिवले तसेच पुर्व न्यायाधीश, सिव्हिल कोर्ट भगवान रहाटे, डॉ.रत्नदिप गेडाम, भंते संघमित्रा, प्राचार्य राहूल डोंगरे आदी अतिथी गण उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन केंद्रीय मानवधिकार संघटन राज्य प्रभारी देवानंद नंदागवळी यांनी केले. संचालन प्रा. सुरज गोंडाने व प्राचार्य युवराज खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शेखर बोरकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटन राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी, नाशिक चवरे, प्रा. शेखर बोरकर, जयेंद्र देशपांडे, मंगेश हुमने, महेन्द्र तिरपुडे, सोपान रंगारी, अश्विनी भिवगडे, प्रा. सुरज गोंडाने, पंकज वानखेडे, प्रवीण भोंडे यांनी केले आहे. कार्यक्रमाची सर्वात प्रथम संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करून करण्यात आले तर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील तसेच राज्यातील संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *