एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : आयुध निर्माणी वसाहतीतील टाईप वन परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करून दोन सायकलीसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री घडल्या आहेत जवाहरनगर परिसरात दिवाळी सण उत्सव बघून चोरट्यांकडून कित्येक चोरीचे प्रयत्न केले गेले आहे. मागील वर्षभरापासून या परिसरात चोरीच्या घटनेत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. ठाणा, पेट्रोल पंप, शहापूर व जवाहरनगर या गावात दर दिवशी चोरीच्या घटनेने डोकेवर केले आहे. भरदिवसा ठाणा येथे रस्त्याने चालत्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळवून नेणे, बाजार परिसरातून मोटारसायकली चोरून नेणे तर कित्येक ठिकाणी घरफोड्या करून लाखोचे मुद्देमाल लंपास करणे नित्याचेच झाले आहे. नुकतेच आयुध निर्माणी वसाहतीतील टाईप वन परिसरात धनजय सिंग क्वा नं. ९७/८, टाईप-१ मध्ये त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आहे. त्यांच्या घरातून दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, एक अंगठी, कानातले आणि नाकातील अंगठी चोरीला गेली आहे. दुसºया घटनेत राजेश मीना क्वा नं. ९४/३ टाईप-१ यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र दरवाजा आंतरलॉक असल्याने तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. राजेश मीना हे त्यांच्या कुटुंबासह गावी गेले होते. याबाबतची तक्रार त्यांचे शेजारी पी.एम. महाणकर यांनी दिली आहे. त्यानंतर त्याच रात्री क्वा नं. ९३/५ टाईप-१ येथील दक्षा सार्वे आणि एशू उंदिरवाडे क्वा नं. ९२/५ टाईप-१ दोन्ही ट्रेड अप्रेंटिस, त्यांची सायकल त्यांच्या क्वार्टरमधून चोरीला गेल्याची लेखी तक्रार सुरक्षा विभागात प्राप्त झाली आहे. या संपूर्ण चोरीच्या घटनेची माहिती सुरक्षा विभागाने जवाहरनगर पोलिस ठाण्यात लिखीत तक्रारीत दर्ज केले असल्याने जवाहरनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार सुधिर बोरंकुटे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दिवसेंदिवस वाढा चाललेच्या चोºया आणि घरफोडीमुळे परीसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण असून सदर चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.