प्रकाश बोरकर करणार युवा संसदेत भंडारा जिल्ह्याचे नेतृत्व

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे १८ व १९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम होणार आहे. यात भंडारा जिल्ह्याचे नेतृत्व येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, विज्ञान महाविद्यालय पवनी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रकाश बोरकर करत आहे. पाच लाख जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यातून ७८ जणांची निवड करण्यात आली होती. त्यात भंडारा जिल्ह्यातून प्रकाश बोरकर याची निवड झाली आहे. हि बाब अभिमानास्पद आहे. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व, वाद विवाद तसेच काव्य वाचन स्पर्धा मधून प्रकाशने यश संपादन केले आहे. तो पवनीतालुक्यातील रहिवासी असून प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत व संघर्ष करत मनात जिद्ध बाळगून त्याने हि उंच भरारी घेतली आहे.

विज्ञान महाविद्यालय पवनी बीएस्सी प्रथम वर्ष मध्ये शिकत असलेल्या प्रकाशची निवड राष्ट्रसंत तुक- डोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर मार्फत झाली आहे. प्रकाश बोरकर च्या निवडी बद्दल प्राचार्य डॉ. विजय लेपसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विठ्ठल पतंगे, डॉ. रिनी जैन यांनी अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *