खोदलेल्या रस्त्यात रोवणी करून भंडारा नगर परिषदेचा निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरीकांचा जीव टांगणीला आला असतांनाही त्याकडे भंडारा नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने आज जय जवान जय किसान संघटनेतर्फे भंडारा शहरातील खामतलाव चौक येथे खोदलेल्या रस्त्यांमध्ये रोवणी करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. नगर परिषद भंडारा संपुर्ण भंडारा शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असुन त्याकरीता शहरातील रस्ते फोडण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्यांची दुरूस्ती न केल्याने नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग नागपुर येथील कार्यकारी री अभियंता यांच्या लापरवाहीमुळे भंडारा शहरातील खात रोड वरील रेल्वे लाईन ते बीएसएनएल कार्यालया दरम्यानचे सिमेंट रस्ताचे काम रखडल्याने पावसाळा असल्यामुळें रस्त्यातील चिखल व खडयामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

या मार्गाने मोठया प्रमाणात नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करतांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याकडे लक्ष वेधण्याकरीता जय जवान जय किसान संघटनेने खामतलाव चौक येथें सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात रोवणी करून नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांच्या आत रस्ता दुरूस्ती न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात मनिष सोनकुसरे, सचिन बागडे,नंदकिशोर नागोसे, लोकेश (सोनु) खोब्रागडे, जगदिश कडव ,राकेश आग्रे, किशोर पंचभाई,अंकीतबत्रा,कमलेश मेंढे, सुधीर नायर,भारती लिमजे, बबन बुधे, संजय चौधरी,साजन हुमने,प्रवीन बोरघरे, राहुल भोंगाडे,लक्ष्मण कनोजीया, मोनु रामटेके, सचिन शहारे, पुष्पा निमजे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *