मंगल कार्यालय मालकाला बुकिंग रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यास शासनाने निर्बंध घातले असताना देखील भंडारा येथील एका मंगल कार्यालयाच्या मालकाने लग्न समारंभासाठी अनामत म्हणून भरलेली रक्कम देण्यास नकार दिल्याने ग्राहक आयोगाने बुकिंग रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण असे आहे की भंडारा येथील छगन डेकाटे व मनिषा बांते यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी धनंजय पांडुरंग दलाल यांच्या गुरूकृपा मंगल कार्यालयाची बुकिंग १० मे व ६ जून २० साठी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी सात हजार व दहा हजार रुपए नकार दिल्याने दोघांनीही अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत भंडारा येथील जिल्हा ग्राहक आयोगाचे समोर तक्रार दाखल केली.

तसेच तक्रारी सोबत शासनाने निर्गमित केलेले निर्बंध आदेश जोडले. सकृतदर्शनी दोन्ही तक्रारीची दखल घेऊन ग्राहक आयोगाचे अध्यक्ष भास्कर योगी व सदस्या वृषाली जागीरदार यांनी तक्रारकर्ता यांना मंगल कार्यालयाच्या मालकाने संपूर्ण अनामत रक्कम ९ टक्के व्याजदराने परत करावे व दहा हजार रुपए प्रकरण खर्चाबाबत द्यावे, असे आदेश पारित केले. या आदेशामुळे कोरोना काळातील मंगल कार्यालयाच्या बुकिंग साठी भरलेली अनामत रक्कम परत न करणाºया मालकांना ग्राहक आयोगाने चांगली चपराक दिली आहे. अनामत म्हणून जमा केले होते. परंतू कोविड १९ च्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने या कालावधीत मंगल कार्यालयात होणाºया लग्न समारंभा सारख्या मोठ्या कार्यक्रमावर बंदी घातली होती. त्यामुळे गुरूकृपा मंगल कार्यालयात लग्न समारंभ न करता राहाते घरीच शासनाच्या परवानगीने लग्न लावण्यात आले. त्यामुळे छगन डेकाटे व मनिषा बांते या दोघांनीही मंगल कार्यालयाच्या मालकाला बुकिंग साठी दिलेली अनामत रक्कम परत मागीतली असता मालकाने बुकिंग रक्कम परत देण्यास

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *