माझ्यावर लावलेले आरोप व गुन्हे बिनबुडाचे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आरटीओ कार्यालयातील स्क्रैप घेऊन पार्टनरशिपमध्ये दिड एकर जमिन घेऊन देतो असे म्हणून आपली ८ लाख ४० हजार रुपयाची फसवणूक केल्याचा रुपेश तितरमारे यांचा आरोप व पोलीसांनी माझ्यावर लावलेले गुन्हे बिनबुडाचे असल्याचा खुलासा पत्रकार सय्यद जाफरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला असून याप्रकरणी आपल्याला न्याय देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असल्याची माहिती जाफरी यांनी दिली आहे. रुपेश तितरमारे याने केलेले आरोप बिनबुडाचे असून विनाकारण कोणतेही कारण नसताना मला यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ६ एप्रिल २०२४ रोजी कोणतीही माहिती न देता प्रेसनोट जारी करण्यात आली व भंडारा पोलीस ठाण्यात रुपेश तितरमारे यांच्या खोट्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मला कोणतीही पुर्वसुचना न देता तथा पोलीस स्टेशनला न बोलावता गुन्हा दाखल केल्यानंतर प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. यात एका वरिष्ठ अधिकाºयाच्या सांगण्यावरून मला गोवण्यात येत असून माज्यावर दबाव टाकला जात आहे. भ्रष्टाचाºयांविरुद्ध बातम्या देणे हा पत्रकाराचा गुन्हा आहे का?, मला या प्रकरणात विनाकारण गोवले जात असल्याचे याप्रकरणाची योग्य चौकशी करुन मला न्याय देण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच येथील आमदार आणि खासदारांना पाठविण्यात आला असून यांच्याकडून न्याय देण्यात यावे अशी मागणी पत्रकार सय्यद जाफरी यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *