विविध मागण्यासाठी आग्री येथील गावकºयांचा मतदानावर बहिष्कार

रामेश्वर राहांगडाले गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील आग्री गावात विविध समस्या असून या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येत्या लोकसभेच्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला आहे. मागील एक महीन्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या नेतृत्वामध्ये तुमसर तहसील च्या आग्री गांवच्या नागरिकांनी आणि आदिवासी बांधव समुदाय कडून मूलभूत बुनियादी नागरी सुविधा नसल्याचा कारणाने लोकसभा चुनाव आणि मतदानाचा बहिष्कार करण्यासाठी नोटिस तहसील कार्यालय तुमसर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, भंडारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावचे नागरिक आणि आदिवासी समाज आगामी लोकसभामध्ये निवडणूकीवर आणि मतदानाचा बहिष्कार करण्यासाठी नोटिस बोर्ड सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहे. नोटीस बोर्डवर उल्लेख केला आहे की, राजकिय पार्टी गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी निषेध केला. प्रवेश केला तर अपमान केला जाईल यासाठी गावकरी जबाबदार राहणार नाही. उल्लेखनीय आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन गेले तरी तुमसर तहसील मुख्यालयपासून काही अंतरावर असलेल्या आदिवासी बहुसंख्या आग्री गांव आजही उपेक्षित, अविकसित व मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

ग्रामीण आदिवासींना समस्या आहे की, पिपरा ते आग्री गावाला जाण्यासाठी पक्का रोड नाही, गावामध्ये मोबाइलचा कवरेज नसल्याने संपर्क व्यवस्था टूटल्यासारखे आहे, स्वास्थ्य केंद्र नसल्याने गर्भवती महिलांना, मुलांना, ग्रामीण, आदिवासी बांधवांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आणि आपातकालीन स्थितीमध्ये त्वरीत स्वास्थ्य सेवा उपलब्ध नाही होत. या ठिकाणी आरोग्य केंद्र बनविण्यात यावे, आदिवासींना रोजगार म्हणून मुख्य साधन शेती आहे, सिंचनाचे साधन नसल्यामुळे दुष्काळीचा सामना करावा लागतो, आणि चांदपुर जलाशयाचे पाणी शेतीपर्यंत पोहचण्याकरीता व्यवस्था करण्यात यावी, पाणी साठवण्यासाठी बोरवेलची व्यवस्था करण्यात यावी, पाणी साठवण्यासाठी गावातले तलावाचे खोलीकरण करण्यात यावी, या विविध मागण्यासाठी निवडणूकीवर व मतदानावर बहिष्कार घालण्याचे आग्री येथील गावकºयांनी निर्णय घेतला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.