सुप्रसिध्द वक्ते विठ्ठल कांगणे आज भंडाºयात

प्रतिनिधी भंडारा : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती, भंडारा २०२४ तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आज महाराष्ट्राचे सुप्रसिध्द वक्ते विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान दसरा मैदान, भंडारा येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. आज पासून समिती तर्फे सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी भंडारा शहर वासियांसाठी राहणार असुन जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष विनय संजय बंसोड, कार्याध्यक्ष हिमांशू मेंढे, सचिव विनीत देशपांडे, कोशाध्यक्ष सुरज डोंगरे, श्रीकांत बंसोड, प्रसिद्धी प्रमुख अजय मेश्राम, संयोजक आसित बागडे, मृणाल गोस्वामी, शरद खोब्रागडे आदी समितीच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *