मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे “अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे “अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या(मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कला शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यास्पर्धेत जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावलीमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.