दानदात्याच्या जागेवर होणार जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- तुमसर तालुक्याच्या मांगली (सि.) येथे जागेअभावी अडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गावातील दानदात्याच्या जागेवर प्रशस्त इमारतीचे बांधकाम होणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करण्यात आली आहे. इमारत बांधकामासाठी आवश्यक दस्तऐवज ग्रामपंचायतीने उपलब्ध केले आहेत.१० लाख रुपयांच्या निधीतून इमारत बांधकाम होणार आहे.इमारत बांधकामाला प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाली आहे. मंजुरी मिळाल्याने गावांत फटाके फोडून आतीषबाजी करण्यात आली आहे. मांगली येथे जिल्हा परिषदेची इयत्ता १ ते ४ थी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. शाळेची इमारत मुख्य मार्गाच्या लगत असल्याने शाळागावाच्या बाहेर हलविण्याची मागणी होती.रस्त्या लगत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या जीर्ण झालेल्या आहेत.

पावसाळ्यात इमारतीचे छत गळत असल्यानेवर्गखोल्यात पाणीच पाणी राहत आहे. यामुळे विद्यार्जन प्रभावित होत आहे.छत आणि इमारतीला भेगा पडल्या असल्याने इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. वर्गखोल्याच्या दोन्ही इमारती कधी कोसळतील याचा नेम नाही.यामुळे एका वर्गखोलीला ताडपत्री टाकुन सुरक्षा कवच देण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.केशवराव रोकडे यांचे खाजगी घरात जिल्हा परिषद शाळेतील दोन वर्ग भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या घरात वर्ग सुरू असतांना अलीकडे साप निघाल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते. यानंतर पालक संतापले होते. दरम्यान जिल्हा परिषद शाळेची इमारत मंजूर करण्याची मागणी होती.गावात जागेचा अभाव असल्यामुळे शाळेच्या इमारतीचे बांधकाम अडचणीत आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.