अपघातात एक ठार,पाच जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : भरधाव अससलेला ट्रक अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक २७५ वडसाकोहमारा दरम्यान खामखुरा गावाजवळ आज १० एप्रिल रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. सुरेश काशीराम शेंद्रे (५५) रा. पठाणटोला ता. सालेकसा असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये केवलचंद चैत्राम चौधरी (२६) रा. बाम्हणी ता. सालेकसा, रवींद्र भाऊलाल आत्राम (४०) रा. पांढरवाडी ता. सालेकसा बिश्नेश्वर छोटेलाल नागपुरे (२६), संदीप अशोक बागडे (२८) दोन्ही रा. बाम्हणी पठाणटोला ता. सालेकसा, ट्रकचालक बाबूदास भाऊलाल नागपूरे (४०) रा. सीतागोठा ता. डोंगरगड जि. राजनांदगाव (छग.) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून जखमींना येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. अपघात एवढा जबरदस्त होता की मृतक व जखमी शेतातील चिखलामध्ये ट्रक खाली दबल्या गेली होती. त्यांना जेसीबी व ग्रामवशियांनी मदतीने बाहेर काढले. पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड पोलीस हवालदार डोंगरवार पुढील तपास करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.