राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने विश्वरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कुडवा, त्रिरत्न बौद्ध विहार श्रीनगर तसेच नवीन प्रशासकीय इमारत समोरील परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी आमदार राजेंन्द्र जैन संबोधनात म्हणाले की, प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीतसमाजाची भावना निर्माण करावी.
भारतरत्न परमपुज्य डॉ बाबा साहेबांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरीणखेडे, अशोक सहारे, मनोहर वालदे, मोहन पटले, विनीत सहारे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, राजू एन जैन, राजेश दवे, रवी मुंदडा, दीपक कनोजे, टी एम पटले, श्याम चौरे, तुषार उके, राहुल वालदे, प्रशांत बागडे, कपिल बावनथडे, राजेश्वर रहांगडाले, उषाताई मेश्राम, त्रिलोक तुरकर, आरजू मेश्राम, राकेश वर्मा, शैलेश वासनिक, हरबक्ष गुरुनानी, सुनील पटले, प्रमोद कोसरकर, एकनाथ वहिले, विनायक खैरे, रौनक ठाकूर, सरभ मिश्रा, कुणाल बावनथडे, कान्हा बघेले, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम व अन्य आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.