ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भीम जयंती साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त त्रिमूर्ती चौक भंडारा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, जिल्हाउपाध्यक्ष यशवन्त सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा विनम्र अभिवादन केले. यावेळी वर्ग सहाचा विद्यार्थी नचिकेत मते यांने आपल्या भाषणात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकºयांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी विधिमंडळावर शेतकºयांच्या मोर्चा काढला होता त्यांनी खोती पद्धती नष्ट करून कुणब्यांना न्याय देणारा कायदा केला.
दुष्काळग्रस्त भागांनापाणी मिळावे यासाठी नद्या जोड प्रकल्पाची योजना आणली शासनाने शेतकºयांना पाणी आणि वीज मोफत दिली पाहिजे.हीत्यांची मागणी होती भारतीय शेती,शेतकरी त्यांच्या समस्या आणि उपाययोजना यावरती त्यांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया हा ग्रंथ लिहिला यावरून स्पष्ट होते की ते जलतज्ञ आणि कृषी तज्ञ देखील होते. अशा महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले.ते शरीराने गेले पण कार्याने आणि विचाराने कायम जिवंत आहेत.जे दुसरीसाठी जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत आहेत. अश्या महामानवास जयंती निमित्त कोटी कोटी प्रमाण करीत आहे असे विचार ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले.यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा महिला अध्यक्ष शोभा बावनकर,संदीप मारबते,कल्याणी मते,स्नेहा पंचबुद्धे, प्रा.किरण मते,अक्षय खोब्रागडे, नितीन नागदेवे,नेहाल भुरे,उदय चक्रधर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *