शेतकºयांना नुकसान भरपाई द्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गेल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान केले. सोबतच २०२३ मधे सुद्धा रब्बी आणि खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ति मुळे शेतकºयांना नुकसान झेलावे लागले. या शेतकºयाांना लवकरात लवकर मोबदला देण्याची मागणी चे एक निवेदन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून दिले आणि जिल्ह्यातील शेतकºयांच्या परिस्थिती बद्दल चर्चा केली. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि त्यमउल्ए झालेल्या नुकसणी बद्दल माहिती दिली आणि निवेदन दिले.

निवेदनात म्हंटले गेले आहे की निसर्गाच्या प्रकोपा मुळे वारंवार अवकळी पाऊस, रोग किडींच्या प्रादुर्भावणे शेतकरी हवालदिल झाला आहे. 10 व ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने भंडारा व पवनी या दोन्ही तालुक्यातील १०३ गावांच्या ४३७४ शेतकºयांचे २३२५ हेक्टर शेतीचे नुकसान केले. याच प्रमाणे भंडारा आणि पवनी तालुक्यात च्या खरीप आणि रब्बी हंगामात सहा वेळा आलेल्या नैसर्गिक आपत्ति मुळे २८ हजार शेतकºयांचे १६ कोटींचे नुकसान झाले होते. शासन तर्फे वरील दोन्ही नुकसणीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्ष रित्या नुकसन भरपाई न मिळाल्याने शेतकºयांमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. नैसर्गिक मार मुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम देण्या संदर्भात योग्य कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *