पीओपी बंदीसाठी मातीमुर्तीकारांचे आमरण उपोषण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शासनाला वारंवार निवेदने देवूनही शासन प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने देवी-देवातांच्या पीओपी मुर्तीवर बंदीची कारवाई साठी मातीमुतीर्कार संघटना व कुंभार संघटनेच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा प्रारंभ केला आहे. यावेळी सर्वप्रथम श्री गणेश व गोरोबा काका यांचे प्रतीमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला मातीमुतीर्कार प्रदेश अध्यक्ष सुरेश पाठक,माती मुर्तिकार भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश हातेल, प्रभा ठाकरे,मंगला पाथरे,रमेश बुरबादे, गजानन बुरबादे नागपूर, सुभाष ताट- कंठीवार चंद्रपुर प्रल्हाद निनावे, आदीच्या मुर्तिकार बांधवाच्या उपस्थित पार पडले. उपोषण कर्ते देविदास हटवार, श्रीधर सावजकर,गोपाल फुंडे ,लक्ष्मीनारायण लिल्लारे,जीवन शिवणकर, याचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी संदर्भात१२मे २०२० रोजीजारी मार्गदर्शक तत्वानुसार देवदेवतांच्या पीओपी मुर्तीची पुजेकरीता विक्री करता येत नाही. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यात व कोंढा कोसरा येथील पीओपी कारखान्यावर कारवाई करण्यात यावी,लोक कलावंता प्रमाणे मुर्तिकार पेंटरला ३ हजार रुपये मानधन द्यावे, पेंटिंग व्यवसायीकांना पेंटिंग किट द्यावी, डिजिटल फँक्स बँनर मुळे बेरोजगार पेंटरला शासनाचे भिंती फलकाची कामे द्यावी. आदी मागण्या घेऊन उपोषण कर्ते बसले आहेत. यावेळी प्रल्हाद निनावे, धनराज बागरे, शिशुपाल शाहुसाखरे,लिलाधर तेलमासरे, मोरेश्वर पाथरे, डाकराम भुरे, हेमंत कुंभरे,लंकेश्वर कांबळे, दिपक ठाकरे,क्रिष्णा ठाकरे,संजय पाठक,ज्ञानेश्वर मानकर,चतूर वालदे, भिमराव वरवाडे, अभिजित वरवाटे, कुंदन कोटांगले, रामचंद्र शिगाळे, दादु काटांगले,लेकराम बोरसरे, परशराम कोटांगले,धनपाल बावनकर, प्रकाश कुसराम,सुजीत तरजुले,जोशिराम नंदरधने,नाजुक नगरकर बबन रुद्राक्षवार अमर बोरसरे,सुरेश रुद्राक्षवार आदी जिल्ह्यातील पेंटर बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक प्रकाश हातेल,संचालन लिलाधर तेलमासरे,आभार लंकेश्वर कांबळे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *