मनगटाचा विकास, स्वसंरक्षणाचे शिक्षण हाच दुर्गावाहीनीचा ध्यास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : इतिहास साक्षी आहे की कधी कौशल्या कधी जिजामाता यांनी श्रीराम, शिवाजी महाराज यांना जन्माला घालून समाजाला आदर्श दिलेला आहे. तर प्रसंगी लक्ष्मीबाई दुर्गावती व चेन्नमा बनून प्रत्यक्ष स्त्रियांनी राणांगणही गाजविले आहे. आज तीच वेळ आपल्या समाजावर आलेली आहे त्यामुळे आपल्या मूली बहीणी स्वसंरक्षण करण्यासाठी तयार व्हाव्यात, कुठलाही प्रसंग आला तर मदतीची वाट न बघता स्वत:चे संरक्षण करू शकतील ह्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद जिल्हा भंडारा वतीने दुर्गा वाहिनी दंड (लाठी काठी) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.६ जून २०२३ ते १६ जून २०२३ या कालावधीत शीतला माता मंदिर येथे सायंकाळी सहा ते सात या वेळेत या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त तरुणीने सहभागी व्हावे असे आवाहन सौ कांचन ठाकरे विदर्भ प्रांत मातृशक्ती संयोजिका यांनी केले आहे. ६ जूनला या शिबिराचं उद्घाटन शाखेच्या आचार पद्धतीनुसार ध्वज लावून, प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले करण्यात आले.

उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलालजी काबरा तसेच विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत उपाध्यक्ष संजय एकापूरे तसेच प्रमुख उपस्थितीत प्रतिमा काब्रा, अनुराधा माने, वैशाली गिºहेपुंजे, मेघा एकापूरे, प्रदीपजी ढबाले उपस्थित होते. प्रशिक्षणाला शिक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर सहकार्यवाह अक्षय मोहनकर असणार आहे. शिबिराचा नियोजन कांचन ठाकरे प्रांत संयोजका तसेच भूमि साकूरे जिल्हा दुर्गा वहिनी संयोजिका यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *