ढोंगी बाबा धिरेंद्र कृष्णशास्त्री यांच्यावर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह त्यांच्या पत्नीविषयी खोटे नाटे वक्तव्य करणाºया ढोंगीबाबा धिरेंद्र कृष्णशास्त्री (धिरेंद्र शुक्ला) बागेश्वर धाम छत्तरपुर मध्यप्रदेश यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेतर्पेष्ठ भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांना पाठविलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. ढोंगी बाबा धिरेंद्र कृष्णशास्त्री यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी त्यांना रोज दंड्याने मारहाण करीत होत्या व ते रोज मार खात होते असे खोटे -नाटे वक्तव्य केले आहे.खोटे वक्तव्य करणाºया त्या भोंदु बाबाचा ओबीसी जनगणना परिषद व ओबीसी संघटना यांनी निवेदनातुन निषेध व्यक्त करीत अशा भोंदु बाबापासुन जनतेचे संरक्षण व्हावे याकरीता भोंदु बाबावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतांना सदानंद इलमे,बाळकृष्ण सार्वे ,वामनराव गोंधुळे, अंजली बांते,जयश्री बोरकर,अज्ञात राघोर्ते,मोरेश्वर तिजारे, पांडुरंग फुंडे,रोशनी पडोळे, भागिरथ थोटे,उमेश मोहतुरे, विवेक पडोळे,राजेश इसापुरे ,संजय मते,सुरेश भवसागर आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *