भारत राष्ट्र समितीत सध्यातरी प्रवेश नाही!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अनेक दैनिक वृत्तपत्रात भंडारा जिल्ह्यातील एक माजी आमदार तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार अशा बातम्या प्रकाशीत होत असल्या तरी, मात्र सध्या पक्ष प्रवेश करणार नसल्याची माहिती माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. नुकत्याच पंधरा दिवसापूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैद्राबाद येथे भेट घेऊन तेलंगणा राज्यातील शेतकºयांना राज्यसरकार कडून पुरविण्यात येणाºया सुखसुविधेवर चर्चा केली असता तेलंगणा राज्य निर्मिती पूर्वी संपुर्ण भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत होत्या. यावर सखोलपणे अभ्यास करुन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यातील विविध प्रकारच्या कोरडवाहू शेतीला सिंचन क्षेत्रात आणण्याकरिता जगातील सर्वात मोठी लिफ्ट अस्तित्वात आणुन संपूर्ण शेती बारमाही ओलिताखाली आणल्या गेली. सिंचनाकरिता लागणारी वीज विनामूल्य चोवीस तास उपलब्ध असल्याने शेतकरी समाधानी असल्याची महत्वपूर्ण बाब लक्षात घेण्यासारखी आहे. तेलंगणा सरकार प्रत्येक शेतकºयांचा पाच लाख रुपयांचा विमा काढुन मृतक शेतकºयांना तात्काळ विम्याचा लाभ देत आहे. याव्यतिरिक्त शेतकºयांना लागवडीसाठी रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात सरसकट प्रती एकर पाच हजार रुपये आर्थिक मदत देऊन संपूर्ण धान्य राज्य सरकार खरेदी होत असल्याने आता मात्र आत्महत्याचे प्रमाण शुन्य आहे.

याव्यतिरिक्त संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत महाराष्ट्रात एक हजार रुपये प्रती महिना मिळते पण तिथे मात्र याच योजनेस दोन हजार रुपये मिळत आहे. अपंगांना आपल्या राज्यात एक हजार तर तेलंगणात प्रती महिना तीन हजार रुपये विनाविलंब मिळत असल्यानेलाभार्थ्यांना कोणताच त्रास सहन करावा लागत नाही.शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नकारिता राज्य सरकार एक लाख रुपयांची आर्थिक मदत करुन मोलाचे कार्य चंद्रशेखर राव सरकार करीत आहे. प्रत्येक गावखेड्यात प्रत्येक घरी पिण्यासाठीस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे.

अशा सर्वच स्तरावरील घटकांचा विचार केल्यास तेलंगणा राज्य गरीब असूनही अशा सर्व सुविधा पुरऊ शकतो त्यामानाने महाराष्ट्र राज्याची देशातील श्रीमंत राज्यात गणना होत असुन महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून, या राज्यात वनसंपदा, खनिज, वीज, पाणी, जंगल अशा जवळपास सर्वच साधनांची उपलब्धता असूनही इथे मात्र आत्महत्येचे सत्र सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमात तेलंगणा सरकारच्या कामगिरीवर सतत बोलत असल्याने अनेक वृत्तपत्रात भंडारा जिल्ह्यातील एक माजी आमदार तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश होणार असल्याची दखल घेतली गेली असली तरी तूर्तास तरी प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री मा.चंद्रशेखर राव यांचेवर प्रभावित असुन सतत संपर्कात असल्याचे मात्र तेवढेच खरे. जेव्हा केव्हा पक्षाप्रवेशाची वेळ येइल तेंव्हा सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. काही वृत्तपत्रात सेना, भाजप राका, कॉंग्रेस असा प्रवास जरी संबोधले असले तरी जो पक्ष शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी, अशा सर्व घटकांचा विचार करीत असेल अशा पक्षात सदस्यत्व घेण्यात गैर काय? त्यामुळे बी आर एस पक्षात प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेणार असून सध्या पक्षप्रवेश घेतला नसल्याची माहिती माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिध्दी माध्यमातून दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *