कृतीतुन स्त्रीयांना आदर द्यावा – गंगाधर जिभकाटे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आई,बहिण,बायको व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भुमिका जगत असतात. मुलांना घडवतांना आई देशाला घडवत असते.फक्त महिला दिनाला स्त्रीशक्तीचा जागर न करता कृतीतुन स्त्रीयांना आदर दिला पाहीजे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी आज सामाजिक न्याय भवनात आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सभापती स्वाती वाघाये, विशेष उपस्थितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते . जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक न्याय सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील ५०० हून अधिक महिला उपस्थित होत्या.

नारी शक्ती महान आहे महिला आज विविध क्षेत्रात कार्यरत असून अगदी संसार सारथ्यापासुन त्या पायलट,वाहक, होवून आकाशी उंच झेपावत आहेत. आत्मविश्वासाने त्यांची भीती निघूनगेली. मात्र अदयापही समानतेचा मोठा दीर्घ पल्ला बाकी असुन त्या दृष्ट्रीने समाज म्हणून सगळ्यांनी भुमिकाबजावणे गरजेचे असल्याचे होत्या. यावेळी विविध क्षेत्रात श्री.जिभकाटे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी केले. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सदस्य धुरपता मेहर, माहेश्वरी नेवारे, गायत्री वाघमारे, राजश्री तिघरे, अनिता नलगोपुलवार, सरीता कापसे, संगीता नवघरे, लता नरूले यांनी महिला दिनाच्या अनुषंगाने विचार मांडले.

माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे, यासह उमेद, जिवनोन्नती अभियानाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत गुणवत्तापुर्ण काम करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमीत्त तृणधान्याच्या पाककला प्रदर्शनाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी भेट दिली. या महिला मेळाव्यात नृत्य, संगीतासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळासह उमेदच्या महीला बचतगटांनी स्टॉल लावले होते. या स्टॉलमध्ये खादयपदार्थ, दागदागिने, यांच्यासह विविध कलाकुसरीच्या वस्तुंचेही प्रदर्शन लावण्यात आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *