तहसील कायालयातील रती घरकल लाभाथ्याना द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा व पवनी तहसील कार्यालयात जमा असलेल्या वाळु चे घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे अशी मागणी भंडारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा व पवनी तालुक्यात मोठया प्रमाणात शासकीय योजनेतुन घरकुल मंजुर करण्यात आले आहेत मात्र जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती अभावी अनेक घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाचे आदेश पारित केले असतांनाही घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे दिसुन येते.रेती अभावी घरकुलाचे बांधकाम रखडल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट झाल्याने त्यांना पावसाळ्यात व हिवाळयात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते तर काही लाभार्थ्यांनी भाड्याचे घर घेतले असुन त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. करीता भंडारा व पवनी तहसील कार्यालयात साठवणुक केलेल्या रेतीचे प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास याप्रमाणे वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतांना पूजा बालु ठवक,सुभाष अजबले ,सतीश सार्वे ,महेश मोहरकर, भागवत वैद्य ,पराग वैद्य, अभय डोंगरे ,राधे भोंगाडे ,हंसराज गजभिये ,मोहन वासनिक आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *