महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाºयांची गय नाही!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महिलांची सुरक्षा हा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या एजेंड्यवरील पहीला महत्वाचा मुद्दा असुन महिलांकडे वाकडया नजरेने पाहणाºयांची गय केली जाणार नाही असा इशारा भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला.आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदे त्या बोलत होत्या. सरकार कुणाचेही असो अशा घटना घडल्यावर सरकार काय निर्णय घेते ते महत्वाचे.मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पिडीतांच्या जखमांवर मिळ चोळण्याचे काम केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यात महीला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. मुलींवर व महिलांवर अत्याचार व सामुहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली होती.मग ती अमरावती मधील घटना असो किंवा मुंबईतील साकीनाका येथील घटना असो.आपल्या विदर्भातीलच हिंगणघाट येथे एका महिलेला जिवंत जाळण्याची घटना घडली होती त्या आठवडयात महिलांना जिवंत जाळण्याच्या बारा घटना पुढे आल्या होत्या.त्यावर आम्ही सरकारकडे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती मात्र अधिवेशन तर घेतलेनाहीच उलट आमच्यावरच गुुन्हे दाखल करण्यात आले.एवढेच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाता इतर राज्यातील महिला अत्याचारांचे आकडे सांगीतले ते अतिशय दुखदायक व वेदनादायक होते असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

गोंदिया येथील महिलेवर गोंदिया व भंडारा येथे करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी कर्तव्यात कसुर करणाºया पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे.नंदुरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार करण्यात आले तिथेसुध्दा कर्तव्यात कसुर करणाºया पोलीसांना निलंबीत करण्यात आले,पुणे येथील एका महिला दुकानदाराला पोलीसाने मारहाण केली त्याप्रकरणात सुध्दा दोषींवर कारवाई करण्यात आली. एकंदरीत भयमुक्त महाराष्ट्र-भितीमुक्त महाराष्ट्र असे चित्र आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहावयास मिळेल असा आशावादही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात लहान मुलींना बळजबरीने पळवुन नेण्याचे प्रमाण वाढत असुन त्यावर आळा घालण्याकरीता ह्यलव्ह जिहादह्ण सारखा कायद्याची गरज आहे.गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद सारखा कायदा यावा अशी आमची मागणी आहे.येणाºया काळात लव्ह जिहाद सारखा कायदा अस्तित्वात येईल असा विश्वास आहे.वसई येथील मुलीसोबत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आहे.पोलीस त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करीत आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्यातील विधानमंडळात सवार्धीक महिला आमदार या भाजपच्याच असुन अनेकमहिला आमदारांची दुसरी-तिसरी वेळ आहे.त्यामुळे मंत्रीमंडळात कुणाला संधी द्यावी असा प्रश्न आहे.येणाºया काळात राज्यातील मंत्रीमंडळात नक्कीच महिलांना संधी मिळेल असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. जितेंद आव्हाडांचा संविधानावर विश्वास असल्यास तर त्यांनी न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा. आमदारकीचा राजीनामा देवुन जितेंद्र आव्हाड हे पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.आव्हाडांची चुक नसल्यास तेही तथ्य समोर येईल. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मी सरकारविरोधात जनहीत याचीका दाखल केली असुन सदर प्रकरण न्यायालयात आहे. रस्त्यावरील लढाई आम्ही लढलो आहे आता न्यायालयीन लढाई सुरू आहे.माझा न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास आहे असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.पत्रकार परिषदेला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, गोंदिया भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रचनाताई गहाणे, भंडारा जिल्हा अध्यक्षा इंद्रायणी कापगते, डॉ.विजया नंदुरकर, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिºहेपुंज, चैतन्य उमाळकर, माजी नगरसेवक रूबी चड्डा,माजी न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाणे आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *