संभाजी भिडेंवर गुन्हा नोंदवा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विकृत मानसिकतेचे धनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभाग, भंडारा शहर कांग्रेस कमेटी तथा जिल्हा इंटकच्या यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदनातुन करण्यात आली आहे.आज दि.२ आॅगस्ट रोजी भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना त्याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मागिल काही दिवसापासुन शिव प्रतिष्ठानचे संचालक संभाजी भिडे हे देशातील देवी देवता तथा महामानवांवर नको त्या शब्दात घाणेरडी टिका करत असुन देशातील जनतेच्या भावना दुखावत आहेत. सध्या स्तिथीत त्यांनी जनतेचे आराध्य साईबाबा यांच्यावर अनिष्ठ टिका टिपन्नी करत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आई-वडीलांच्या व स्व: त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबातीत खालच्या पातळीवर टिका केल्या आहेत. या प्रकारामुळे देशातिल सर्व समाजामध्ये तणाव निर्माण होऊन जातिय दंगली घडुन येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. करीता समाजातील तणाव कमी होण्याकरीता व देशात शांतता कायम राहावी याकरीता संभाजी भिडे यांना शासन करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतांना कांग्रेसचे भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवने, सुनंदा धनजोडे, राजविलास बोरकर, किशोर राऊत, पृथ्वीराज तांडेकर जिवन भजनकर, राकेश कोडापे, दिलीप कोडवानी, नरेंद्र साकुरे, प्रकाश डोनेकर, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *