विदर्भात थंडीची तीव्र लाट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विदर्भात हाडे गोठवणाºया थंडीचा कहर सुरूच असून, गुरूवारीही थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. बुधवारच्या तुलनेत आज नागपूरच्या तापमानात किंचित वाढ अवश्य झाली, मात्र बोचरे वारे व हवेतील गारठा कायम होता. विदर्भासह राज्यात लागोपाठ दुसºया दिवशी यवतमाळमध्ये नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जसजसा डिसेंबर महिना संपतोय तसतसा हिवाळा अधिकाधिक तीव्र होत आहे. कडाक्याच्या थंडीने अख्ख्या विदभार्लाच आपल्या कवेत घेतलेआहे. गुरूवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात पुन्हा घट झाली.

मंगळवारी या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या नागपूरचापारा ०.४ अंशाने वाढून ९.८ अंशांवर स्थिरावला. तर यवतमाळचा पारा ०.३ ने घसरून ८.७ अंशांवर आला. येथे नोंद झालेले तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात नीचांकी होते. याशिवाय गोंदिया (९ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (९.४ अंश सेल्सिअस), गडचिरोली (९.६ अंश सेल्सिअस), वाशीम (९.८ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहाच्या खाली आले. अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी येथेही थंडीचा कडाका जाणवला. थंडीच्या लाटेने गावखेड्यांतील नागरिकच नव्हे, शहरवासीयदेखील तितकेच त्रस्त आहेत. दोन-दोन स्वेटर्स व जॅकेट घालूनही थंडी जात नसल्याची नागपूरकरांमध्ये चर्चा आहे. थंडीमुळे साध्या पंख्यांची गरगर थंडावली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *