उपराष्टपतीच्या सन्मानाथ भडाºयात भाजपाच आदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारताचे उपराष्टÑपती व राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांचा अवमान करणाºया इंडिया आघाडीने देशाचे माफी मागावी या मागणीकरिता भारतीय जनता पार्टी तर्फे आज भंडारा येथील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाºया देशातील संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्टÑपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले. तर स्वत:ला शहाणे म्हणवणारे काँग्रेसचे खासदार राहूल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते.

हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असून काँग्रेस व तृणमूल काँग्रेस हे घटक पक्ष असलेल्या इंडिया आघाडीचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. याकरिता आज २१ रोजी शहरातील गांधी चौकात भाजप प्रदेश, जिल्हा व शहर कार्यकारणी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, माजी नगरसेवक, नगरसेविका, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. प्रसंगी खासदार कल्याण बॅनर्जी व राहूल गांधी यांच्या कृत्याबद्दल नारेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच संपूर्ण आयएनडीआयए आघाडीने याविषयी जनतेची माफी मागण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी लावून धरली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *