साकोली येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोली येथे राष्ट्रीय गणित दिवस भारताचे महान गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला. गणितीय दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांनी शाळेत विविध गणितीय आकर्षक प्रोजेक्ट चे सादरीकरण केले. शाळा व्यवस्थापक जी.एच. ठाकरे ह्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दायक मार्गदर्शन करुन महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कु.रिद्धी खुने ह्यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु.गायत्री वलथरे ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र. मुख्याध्यापक अतुल नंदेश्वर, गणित विषयाचे शिक्षिका सारिका ठाकरे, विद्यासागर तिरपुडे, निखिल निंबेंकर, धनराज मेश्राम, केतन हत्तीमारेविजया पडोळे, स्नेहदिप सहारे, नंदा कापगते,रिता कुंभारे, धामेद्र वलथरे, शरद कोसरे, मृनाली कोसे, शिवाली गुप्ता, सचिन मारवाडे कमलेश वासनिक, पुष्पलता आसलवार, पुनम वाडीभस्मे, यशि टंग, शिरीन शेख, श्रुनाली जंवजाळ ह्यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *