बेपत्ता श्रद्धाचा जळालेला मृतदेहच आढळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : श्रद्धा ही बेपत्ता झाल्याचा कांगावा करण्यात आला मात्र तिला ठार मारून पोत्यात भरून संधी साधून तनसीच्या ढिगारावर मृत श्रद्धाचे पोत्यात भरलेले प्रेत ठेवून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी गावातील शेतात जळालेल्या तनसीच्या ढिगाºयात आढळून आला आहे. श्रद्धा किशोर सिडाम वय ८ वर्ष असे मृत बालीकेचे नाव आहे. घटना साकोली तालुक्यातील पापडा/खुर्द गावातील आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह पोलीस अधिकाºयांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. गेल्या २४ तासांपासून पोलीसांकडून बालीकेची शोध मोहीम सुरू होती . मिळालेल्या माहितीनुसार, पापडा खुर्द गावात ७० कुटुंब वास्तव्यास असून ३७५ लोकसंख्या आहे.श्रद्धा ही पापडा खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे सोमवारी दुपारी दीड वाजता शाळा सुटली. दुपारी ४.३० वाजेपर्यंत श्रद्धा तिच्या बहिणीसोबत घरी होती. यानंतर श्रद्धा घराबाहेर आवारात खेळण्यासाठी गेली. पण ती घरी परत आली नाही. गावात शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत श्रद्धा सापडली नाही.

घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. सोमवारी रात्री १०.३० वाजता पोलीस अधीक्षक लोहित मतानी स्वत: आपल्या ताμया सहित पापडा खुर्द गावी पोहोचले व श्रद्धाची शोध मोहीम सुरू केली . श्वानपथकाच्या मदतीने श्रद्धाचा शोध घेण्यात आला. शोध मोहीम मध्ये गावातील प्रत्येक घर व गावाजवळील परिसर पोलिसांनी पिंजून काढला. या प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून होते. या घटनेमुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते रात्रंदिवस पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. दरम्यान, गावातील नामदेव पंढरी लांजेवार यांच्या शेतात पोलीस पाटील मारोती चमरू झोडे यांनी तनिस ठेवली होती. याच जळलेल्या तनसीच्या ढिगाºयात बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी श्रद्धाचा मृतदेह मारोतीचा भाऊ रूपचंद चमरू झोडे यांना सकाळी सात वाजता दिसला त्यांनी गावात येऊन तनसीचे ढीगार जळत असल्याची माहिती दिली. जळत असलेल्या तण्रसीच्या ढिगारावर पोत्यात भरून जळालेल्या अवस्थेत श्रद्धाचा मृतदेह आढळला.

घटनास्थळ हे मृतक बालिकेच्या घरापासून जवळ असल्याने अनेक शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. श्वान पथकही श्रद्धाच्या घराच्या बाजूचे दोन घर सोडून त्याच दिशेने एका घरासमोर थांबत असल्याने संशयाला जागा निर्माण झाल्याचे चित्र आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला मृतदेह उत्तरीय तपासणी करिता नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की संशयित आरोपीं विरोधात कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक पेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता पोलीस अधीक्षकांनी वर्तवली असून लवकरच आरोपी गजाआड होण्याचे संकेत दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *