वादळी वाºयामुळे अतोनात नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवार, २७ मे रोजी सायंकाळी आलेल्या अवघ्या २० मिनिटांच्या वादळी वाºयामुळे अनेक घर तसेच शेतातील पीक असे लाखो रूपयांचे नुकसान झाले. हाती आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच बिरसी, जामखारी येथे शेड उडाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून एक मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान, आमदार सहसराम कोरोटे यांनी यांनी जामखारी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी तहसीलदारांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.शनिवारी अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे तालुक्यातील जामखा-री या गावाला वादळी वाºयाचा तडाखा बसला असून शेतकरी व गावकºयांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच आमदार कोरोटे यांनी जामखारी गावाला भेट दिली असून तहसीलदारांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बहेकार, जिल्हा परिषद सदस्य छबू उके, पंचायत समिती सदस्य नंदकिशोर कोरे, नायब तहसीलदार सतीश वेलादी, राधाकिसन चुटे, महेश उके, भैय्यालाल बावनकर तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *