तुमसर तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत मध्य प्रदेश राज्याच्या सिमेलगत असलेल्या नदीपात्रातुन मोठया प्रमाणात अवैध रेती चा उपसा करून त्याची वाहतुक केली जात आहे. यामुळे महसूल विभागाचे लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे. या अवैध रेती व्यवसायात स्थानीक राजकीय नेते व कार्यकर्ते यांची सक्रिय भूमिका असल्याचे दिसुन येते.या अवैध रेती वाहतुकीला महसूल व पोलीस विभागाचे पुर्णपणे पाठबळ असल्याचा आरोप नागरीकांकडुन केला जात आहे.याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसतांनाही संपुर्ण जिल्ह्यातुन मोठया प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा करून त्याची मोठया प्रमाणात वाहतुक केली जात आहे.

तुमसर तालुक्यातील महालगाव,वारपिंडकेपार, सोंडया, कवलेवाडा, धुटेरा,चांदमारा,आष्टी आदि रेती घाटातुन ट्रॅक्टरच्या सहायाने मोठया प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा करून त्याची नदीकाठावर साठवणुक करून रात्रीच्या वेळी ट्रक-टिप्परच्या माध्यमातुन त्याची अवैधरित्या वाहतुक केली जात आहे.भरदिवसा रेती घाटातुन रेतीचा उपसा करून त्याचीसाठवणुक केली जाते तर रात्रीच्या अंधारात ट्रक-टिप्परच्या माध्यमातुन त्याची वाहतुक केली जाते. हा सगळा प्रकार मागील अनेक महिन्यांपासुन राजरोसपण सुरू असुन या रेती चोरीमध्ये महसूल व पोलीस विभागाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचा आरोप नागरीकां कडुन केला जात आहे.भर दिवसा रेती घाटातुन रेतीचा उपसा सुरू असतांना संबंधीत तलाठी,मंडळ अधिकारी ,पोलीस बिट जमादार यांचे याकडे दुर्लक्ष होणे याचेच नवल वाटते. करीता याकडे भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.