पुढील पाच दिवस थंडीचे; महाराष्टÑ गारठणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानीत आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदभार्तील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होणार आहे. तसेच सध्या वाºयाची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्री वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गोंदिया आणि नागपूर पाठोपाठ वर्धात्न व गडचिरोली शहरात ९.४ तर ब्रम्हपुरी येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक तापणाºया चंद्रपूर शहरात देखील किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस आहे. त्यापाठोपाठ अमरावती १०.४, यवतमाळ १०.७, अकोला ११ तर बुलडाणा येथे ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा प्रत्यक्षात उतरणार असून फेब्रुवारी महिन्यात देखील थंडी कायम राहील असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.