ढगाळ वातावरणाने रब्बीवर संक्रांत!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: नववर्ष लागून तीनच दिवस झाले नाही, तोच बुधवारी (४ जानेवारी) सकाळपासून बोचरी थंडी व त्यापाठोपाठ ढगाळ वातावरण तयार झाले. याचा नुकत्याच फुटू लागलेल्या आम्रवृक्षासह फुलोºयातील सर्वच पिकांच्या बहारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरत्या वर्षात ११ ते १५ डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरण व काही भागात पाऊस झाला होता. आता दुसºयांदा पुन्हा ढगांचे मळभ रब्बी हंगामावर दाटून आले आहे. याची शेतकºयांनी धास्ती घेतली आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला. सिंचन प्रकल्पात व विहिरींना पाणी आहे. सर्वत्र रब्बी हंगाम घेतला जात आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, दादर हा पिकपेरा वाढला आहे. सर्वच पिकांचा बहार संकटात जवळजवळ ७0-८0 टक्के रब्बी पेरण्या आटोपल्या आहेत. यातील आॅक्टोबर बोचरी थंडी व ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभºयाला बाधा होण्याचा संभव आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील सर्वच पिकांवर मावा चिकटा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याकरता शेतकºयांना कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणीच्या खर्च वाढणार आहे. आधीच हिवाळ्याचे दोन महिने संपले तरी थंडी अशी जाणवली नाही. किमान व कमाल तापमान देखील वाढलेले असल्यानेआता पिकांची वाढ. निस्वन कीड रोग प्रादुर्भाव असा परिणाम झालेला दिसून येत आहे. हे कमी की काय? ऐन पौष या चांगल्या थंडीच्या महिन्यात ढगाळ वातावरण एकूणच रब्बी व संक्रात आली आहे. खरिपातील तूर शेंगा बरण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांना अशा वातावरणाच्या फटका बसणार आहे. शिवाय ढगाळ वातावरणाचा किडरोग अनेक पिकांवर करपा वाढण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणा बरोबरच अधून मधून धुके पडत असल्याचे देखील पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. हे रोगट वातावरण शेतकरी, शेतमजूर, ऊस तोडणी मजूर, मेंढपाळ यांच्यासह गाई- म्हशी आधी दुभत्या जनावरांना व मेंढी बकरी त्यांना देखील त्रासदायक ठरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *