शहरातील उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना ६) लाखनी शहराच्या मध्य भागातून जातो. ह्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे सुसाट वेगाने वाहने धावत होती. त्यामुळे लाखनी शहरात अपघाताचे मोठे प्रमाण वाढले होते अपघात होऊन काहींना आपलं जीव गमवावा लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे लाखनी शहरात उड्डाण पूलाची निर्मिती व्हावी यासाठी निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करण्यात आली. याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेऊन राजमार्ग प्राधिकरणाचे माध्यमातून उड्डाण पुलाचे बांधकामास मंजूरी प्रदान करण्यात आली. ईनिविदा पद्धतीने उड्डाण पूल बांधकामाचे कंत्राट मुंबई च्या जेएमसी कंपनीला देण्यात आले होते. तब्बल ४ वर्षाच्या कालावधी नंतर बांधकामाची प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. कंपनीने उड्डाण पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू केले व पूर्णत्वास आणले मात्र लोकर्पणापूर्वीच त्यावरून वाहतूक २९ एप्रिल पासून सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात वाहतुकीनंतर २९ मे २०२२ ला उड्डाण पुलाचे लोकार्पन साकोली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी खा. सुनील मेंढे आ. परिणय फुके माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत लोकार्पन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हा उड्डाण पुल स्टेट आॅफ आर्ट टेक्नोलॉजी चा उत्तमनमुना असून यावर्षी उत्कृष्ट उड्डाण पुल बांधकाम पुरस्कारासाठी या उड्डाण पुलाचा विचार करण्यात येईल. अशी ग्वाही दिली होती. मात्र ती ग्वाही फोल ठरण्याचे मार्गावर असून तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे अवघ्या ७ महिन्यात हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी शुक्रवार (ता. ६ जानेवारी) सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाण पुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर उड्डाणपुल केसलवाडा/वाघ फाटा ते लाखनी स्मशानभूमी पर्यंत अंतर २ किमी व ७७ कॉलम चे असून उड्डाण पुल ६ पदरी आहे. या पुलाचे उद्घाटन तत्कालीन पालक मंत्री विश्वजित कदम, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे प्रमुख उपस्थितीत साकोली येथे कामगारांना पेटी वाटप कार्यक्रमात ३० एप्रिल पर्यंत लाखनी व साकोली उड्डाण पुलाचे लोकार्पण करावे. अशी तंबी दिली होती. त्यामुळे लोकार्पणावीणा २९ एप्रिल रोजी या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. त्या नंतर महिनाभराने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते डिजिटल लोकार्पण करण्यात आले. हा उड्डाण पुल सुरू झाल्यापासून पूलावरून वाहने गेल्यास मोठा आवाज येत असून काही ठिकाणी भेगा पडल्या. मात्र त्याबाबत कोणतीही चौकशी जेएमसी कंपनीने न केल्यामुळे बांधकाम कामावर व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून बांधकाम सदोष तर नाही अशी शंका नागरिकांत असताना दुरूस्ती साठी उड्डाण पुल बंद करण्यात आल्याने नागरिकातून पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे भाकीत खरे ठरले हे मात्र विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *