ईटान-कोलारी सेतू पूर्णत्वाची चातकवाट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : “रस्त्याची अखंडता, देश्याची एकात्मता” या ब्रीदवाक्यासह भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाºया वैनगंगेवरील ईटान-कोलारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३९ लक्ष रुपयांच्या निधीला १९ जुलै २०१८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली. या पुलाच्या सर्वेक्षणाचे काम २०१८ मध्येच सुरू झाले असून त्याच वर्षी दोन महिन्यानंतर या बहुप्रतिक्षित ईटान-कोलारी पुलाच्या विकास कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. जवळपास मार्च २०२४ पर्यंत या बहुप्रतिक्षित ईटान-कोलारी पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात असल्याने परिसरातील जनतेस दोन्ही जील्हावसियांना या सेतू पूर्णत्वाची चातकवाट लागली आहे.

सुमारे ४५ वर्षापूर्वी किटाडी ते विरली या जिल्हामार्गाचे बांधकामा दरम्यानच या ईटान-कोलारी पुलाच्या निर्मितीहेतू सर्वेक्षण झाले होते. मात्र, काही कारणास्तव कालांतराने हा सेतू निर्मितीचा प्रस्ताव मागे पडला असता भंडारा जिल्ह्यातील काही समाजसेवकांनी “सेतू निर्माण कृती समितीची” स्थापना करून या समितीच्या माध्यमातून जणू या पुलाची धुरा खांद्यावर घेवून भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा सेतू ईटान-कोलारी दरम्यानच व्हावा यासाठी शासन, प्रशासन आणि भाजप संघटनेकडे सातत्याने दमदारपाठपुरावा घेतला. त्यांच्या या लढ्याचे फलित म्हणून या पुलाच्या व रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली असून सद्यस्थितीत या सेतू निर्मितीचे काम प्रगती पथावर आहे.

या पुलाच्या निर्मितीने भंडारा जिल्ह्यातील इटान, विरली(खुर्द) व विरली(बु) या गावांना विशेष महत्त्व येणार असून लाखांदूर तालुक्यातील इतरही गावांना कमालीचा फायदा होणार आहे. ९.५ किमीच्या विरली ते इटान या बहुप्रतिक्षित रस्त्याचे व दोन जिल्ह्यांना जोडणाºया पुलाच्या बांधकामाचे साकोली येथे भूमिपूजन झाले होते. तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांना या कामाच्या सुरुवातीची चातकवाट होती.

या ईटान-कोलारी सेतूनिर्मितीमुळे चंद्रपूर व भंडारा जिल्हाला “एकाच बाकावरील दोन मित्र” म्हणता येईल. तसेच या सेतूनिर्मितिमुळे चंद्रपूर-भंडारा जिल्ह्यात येजा करण्याकरीता लागणाºया वेळेची बचुती होणार असून लागणारा वेळ आणि त्रासात कपात होईल.

एकंदरीत दोन्ही जिल्ह्यांतर्गत दळण वळण सोईचे होणार आहे. मात्र, ५ वर्षानंतरही अद्याप या सेतूनिर्मितीचे काम पूर्णत्वास आले नसून दळणवळण, औद्योगिक व व्यावसायिक एकंदरीत विकासाच्या सोयीच्या कृष्टीकोनातून सर्वांना ईटानकोलारी सेतू पूर्णत्वाची चातकवाट आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.