स्पर्धा म्हणजे खेळाडूंसाठी मेजवानीच : अश्विन नशिने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : कोणत्याही खेळाची स्पर्धा आयोजन करणे म्हणजे खेळ- ाडूंना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळते. साकोली येथे आम्ही लहानपणापासून व्हॉलीबॉल च्या स्पर्धा पाहिलेले आहेत परंतु, मध्यंतरी ह्या स्पर्धा झाल्या नाहीत यावर्षी ग्रामीण वाली स्पर्धा आयोजन करून आयोजकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खेळाडूंना मेजवानीच दिली असे मत शहर काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन नशीने यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगरसेवक अ‍ॅड. मनीष कापगते, हेमंत भारद्वाज ,सुभाष बागडे, सौ. नलिनी सुरेश रंगारी शहर काँग्रेसचे सहसचिव जितेंद्र नशीने, माजी व्हॉलीबॉल खेळाडू फईम कुरेशी, इक्बाल पठाण, क्रीडा संघटक, सचिव शाहिद कुरेशी प्रामुख्याने उपस्थित होते. साकोली येथील क्रीडा संकुल च्या व्हॉलीबॉल मैदानावर वन स्टेप फॉर वॉलीबॉल क्लब तर्फे ग्रामीण वॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास पंधरा संघांनी सहभाग घेतला होता. उपांत्य पूर्व सामन्यात साकोली व मो अर्जुनी च्या संघात अत्यंत चुरशीच्या सामना झाला. साकोली च्या संघाने अंतिम सामन्यात गिरोला वॉलीबॉल संघाच्या तीन शून्याने पराभव करीत ग्रामीण संघात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

तिसºया क्रमांकासाठी मो अर्जुनीच्या संघाने साकोली ब संघाचा पराभव करीत तिसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या बेस्ट स्मॅशर म्हणून साकोलीच्या खेळाडू पियुष बांगरे याला अ‍ॅड. मनीष कापगते व प्रशांत डोमळे यांच्यातर्फे रोख रक्कम देण्यात आली. बेस्ट लिफ्टर म्हणून गगन खोब्रागडे याला सुमित शहारे व राजन हुकरे तसेच बेस्ट लिबरो म्हणून युवराज बोबडे याला विकी लाडे व सुभाष बागडे यांच्यातर्फे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिकेत नागोसे, गगन खोब्रागडे, रुपेश चिरवतकर, युवराज बोबडे, आर्यन टेंभुर्णे व वालीवल क्लबच्या सर्व लहान- मोठ्या खेळाडूंनी सहकार्य केले. पंच म्हणून वसीम पठाण, मरसकोल्हे, शोएब शेख, तुषार मारवाडे, गिरीश निर्वाण, नंदेश्वर, यांनी कार्य केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी भंडारा जिल्हा वॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष विकास राऊत, भंडारा जिल्ह्याचे वॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू दीपक रायपूरकर, डॉ प्रकाश सिंग, शैलेंद्र सिंग राजपूत, सलीम अन्सारी, तालुका क्रीडा अधिकारी मनोज पंधराम राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराम चौधरी, जिल्ह्यातील आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण स्पर्धा व कार्यक्रमाचे संचालन व आभार क्रीडा संघटक, सचिव शाहिद कुरेशी यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *