चिकना येथे अवैध रेतीसाठा जप्त

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : तालुक्यातील चिकना येथे तब्बल दोन तिन वर्षांपासून अवैध रेतीची साठवणूक करून तीच रेती परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना जादा दराने विक्रीचा गोरखधंदा गेल्या कित्येक वर्षांपासून सूरू होते मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने ग्रा.प.पदाधीकाºयांनी पुढाकार घेत महसूल विभागाला लेखी तक्रार दाखल केले असता नायब तहसीलदार पाथोडे यांनी आपल्या पथका सहीत चिकना गाव गाठून साठवणूक केलेल्या रेतीचा सोनं घेऊन रेती साठा जप्त केला मात्र जप्ती केलेली रेतीकुणाची हा प्रश्न मात्र गावक-यांना पडला आहे.

गावात पुन्हा रेती तस्करीचा सत्र सुरू होणार का ? अवैध रेती वाहतूकीमुळे रात्रोदरम्याम गावक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो ट्रॅक्टर च्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले रात्रभर झोपत नसून यांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असल्याचेही गावकरी सांगतआहेत. सदर जप्ती केलेला रेती साठा टिप्परमध्ये भरून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे या कारवाई करतेवेळी नायब तहसीलदार पाथोडे,तलाठी-बिसेन, सरपंच- मनीषा मंगेश दहिवले, उपसरपंच प्रकाश शेंडे,पोलीस पाटील सौ- उर्मिला टांगसेलवार,ग्रा.प.सद्स्यप्रशांत दहिवले, तुलाराम गणवीर, सदस्या- भाग्यश्री सामृत्वा, उषा टांगसेलवार, सुजाता रंगारी,लता सुरपाल, त.मु.स.अध्यक्ष मंगेश दहिवले, समाजसेवक यशवंत टांगसेलवार उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.