नाकाडोंगरी आंतरराज्यीय महामार्गावर खड्डेचखड्डे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोबरवाही : तुमसर, नाकडोंगरी, कटंगी, हा आंतरराज्यीय महामार्ग आहे. हा रस्ता बालाघाट व जिल्हा सिवनी जिल्ह्याला जोडतो. उत्तर प्रदेशात जाणारा सर्वात कमी अंतराचा महामार्ग आहे. गेल्या ४ वर्षापासून बावनथडी नदीच्या मोठ्यापुलावरून जड वाहतुक बंद आहे. प्रवासी बसेस ही बंद आहे. मात्र येदरबुची गाव फाटयाजवळ या आंतरराज्यीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महामार्गावरून पायदळ चालणाºया व वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अपघात झाल्यास हे खड्डे जीवघेणे ठरणार यात शंका नाही. कारण या रस्त्यावरुन येथील नागरिक तर येजा करतात, परंतू या परीसरातील विद्यार्थी सुद्धा या रस्त्यावरुन प्रवाश करतात.

राजापूर गावाचे माजी उपसरपंच वसंत बिटलाये यांनी सार्वजनिक बांधकाम भंडारा विभागाकडे मागणी केली आहे कि, धोकादायक खड्डे बुजवणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे बावनथडी नदीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भव्य पूल बांधणे आवश्यक असून, पाणी साठवण्यासाठी, बैरेज बंधारे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. याचा बालाघाट व तुमसर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना फायदा होईल, बैरेज बनविल्यास शेतकºयांसाठी वरदान ठरेल. करीता सदर रस्त्याचे लवकरात लवकर डागडुजी करुन खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी माजी उपसरपंच वसंत बिटलाये यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *