देशी दारुसह चारचाकी वाहन जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव शिवारातील ठाणा मार्गावर सापळा रचून पोलिसांनी देशी दारुच्या ४६८ बाटल्या व चारचाकी वाहन असा २ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. गोरेगाव येथून ठाणा मार्गे चारचाकी वाहनातून विनापरवाना देशी दारुची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने ठाणा मार्ग चौकात सापळा रचला. यावेळी एमएच २, बीजी ३१२२ या चारचाकी कारची तपासणी केली असता कारमध्ये देशी दारुच्या ४६८ बाटल्या विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळले. याप्रकरणी वाहनचालक तथा मालक भुमेश मुलचंद राऊत (२४) रा. बोटे याला अटक करुन गोरेगाव पोलिसांनी कलम ६५ (ई), ७७ (अ), ८०, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांच्या विशेष पोलिस पथकामधील पोहवा सुजित हलमारे, महेश मेहर, पोना शैलेषकुमार निनावे, पोशि सन्नी चौरसिया, दया घरत, हरिकृष्णा राव यांनी केली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *