खंड विकास अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे नागरीक त्रस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी अनेकदा कार्यालयात हजर राहत नाहीत तर कधी हजर राहिले तर काही विशेष लोकासह व्यस्त असल्यामुळे शिक्षक,पेशनर व सामान्य नागरिकांना तासन तास वाट पाहत बसावे लागते ज्यामुळे आपल्या तक्रारी व अडचणी घेऊन येणारे शिक्षक पेशनर व नागरिक त्रस्त आहेत. तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सुरूअसलेले महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे कामावर मजुरांना कमी मजुरी काढू अशी भीती दाखवून त्यांचे कडुन पैसे घेऊन तर रोजगार हमी योजनेचे कामावर काही ठिकाणी यांत्रिक मशीनरी द्वारे कामे करून मजुरांच्या नावे दाखवण्यात येत असल्या च्या अनेक तक्रारी तसेच घरकुल ,गोठे,स्वच्छ भारत अभियान व ईतर विभागा अंतर्गत मंजूर झालेले नागरिकांना या विभागातील कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही किंवा काम होऊनही त्यांची देयके देण्यास अनेक फे?्या मारुनहि टाळाटाळ करीत असतात अशा अनेक तक्रारी व आपल्या समस्या खंडविकास अधिकारी यांचे कडे मांडण्यास येणारे नागरिकांना त्यांचे आधीनस्त कर्मचारीआज साहेब मिटींगला आहेत, कधी दौ?्यावर आहेत तर कधी कार्यालयात आले मात्र इतर कुठेतरी व्यस्त आहेत तर एखाद वेळेस कार्यालयात हजर असल्यास सामान्य नागरिकांना भेट न देता काही विशेष व्यक्तीसह वा पदाधिकारयासह व्यस्त आहेत तुम्ही थांबा असे सांगून तासंनतास या नागरिकांना ताटकळत ठेवतात ज्यामुळे कामाबाबत असलेल्या नागरिकांच्या तक्रारी व त्या तक्रारी सोडवण्यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने तसेच अनेक कामाचे तक्रारीवर महिनोन्महिने चौकशी वा कार्यवाही होत नसल्याने पंचायत समिती तिरोडा अंतर्गत होत असलेल्या अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असला तरी त्यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नागरिक त्रस्त असून या गंभीर बाबीकडे कोणतेही जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी याकडे लक्ष देऊन हे अधिकारी कार्यालयात हजर राहुन कामावर भ्रष्टाचार करणाराणवर कार्यवाही करावी अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *