धान घोटाळ्यातील ९ आरोपींना पोलिस कोठडी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोेंदिया : सालेकसा येथील समृद्ध किसान संस्था यांच्या संचालक मंडळाने शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला ८ हजार क्विंटल धानाचा १ कोटी ५५ लाख २० हजार रुपयाचा अपहार केला. या प्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी ९ संचालकांना अटक केली. न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी दिली. घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संस्थेचे अध्यक्ष वास- ुदेव महादेव चुटे हे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सालेकसा येथील समृद्ध किसान संस्थेने महासंघासोबत केलेल्या कराराप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाºया नियम व अटीच्या अधीन राहून धान खरेदीचे कार्य केले. परंतु हंगाम २०१९-२२ मध्ये संस्थेने शेतकºयांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची भरडाई करण्याकरिता मिल धारकांना उचल देणेबंधनकारक असताना, समृद्ध किसान संस्थेने धानाची उचलणी केली नाही. याप्रकरणी जिल्हा पणन विभागाने संस्थेच्या गोदामात धान साठ्याची पाहणी केली असता आधारभूत खरेदी योजना अंतर्गत खरेदी केलेला ८ हजार धान आढळला नाही. त्यामुळे संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सालेकसा पोलिसांनी याप्रकरणी ९ आरोपींना अटक केली असून मुख्य सुत्रधान संस्थाअध्यक्ष वासुदेव चुटे फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *