वाचनामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्वोच्च पदावर पोहचणे शक्य – आ.अभिजीत वंजारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्रतिकूल परिस्थितिवर मात करून देशातील सर्वोच्च पदावर पोहचणे फक्त वाचनामुळेच शक्य आहे असे प्रतिपादन आमदार अभिजीत वंजारी यांनी मराठी भाषा विभाग मुंबई, जिलाधिकारी कार्यालय, भंडारा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे केले . आज भारताचे माजी राष्ट्रपति डॉ. ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन वाचन प्रेरणा दिन सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे जिल्हाधिका- री संदीप कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माधव पत्रिकर ,माजी ग्रंथपाल आर.एस. मुंडले आर्ट्स कॉमर्स कॉलेज, नागपूर हे तर उदघाटक म्हणून विभागीय उपअधिकारी, भंडारा हे होते , विशेष अतिथि म्हणून आमदार अभिजीत वंजारी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, डॉ चंद्रकांत वड्सकर, विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा, अरविंद हिंगे, तहसीलदार भंडारा, सुनील पाटिल,सचिव, गांधी निधि स्मारक नागपूर, प्रमोद अनेराव साहित्यिक भंडारा हे होते. सुरुवातीला दिप प्रज्वलन व करून . ऐ. पी. जे.अब्दुल कलाम व सरस्वती यांच्या प्रतिमे चे पूजन करण्यात तसेच ग्रंथ प्रदर्शिनीचे उदघाटन पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ लेखक नीलकंठ रणदिवे, हर्षल मेश्राम व अमृत बंसोड़ यांचे शाल श्रीफल व मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आले,तसेच आमदार वंजारी यांच्या सन २०२१-२२ या आर्थिक वषार्तील स्थानिक निधीतुन जिल्ह्यातील सात शासन मान्य ग्रंथालयाना रक्कम रू ८३४०००/-चे ग्रंथ वितरित करण्यात आले, तसेच हिमालय प्रकाशन नागपूर यांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विमोचन करण्यात आले, . ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांचे जिवन आपल्याला स्फूर्ति देणारे असून ग्रंथाच्या सहवासाने ते इथ पोहचले म्हणून ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे करीता राज्यातील सार्वजनिक ग्रंथलायचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार वंजारी यांनी यावेळी केले तर, डॉ.ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांचे सपूर्ण जिवनच एक आदर्शवादी असून एक वैज्ञानिक ते राष्ट्रपति पर्यंत चा प्रवास एक अदभुत आहे असे उदगार श्री संजय राठोड यांनी केले तर ग्रंथ वाचन मुळे माणूस क्रिया शील होतो व सकारात्मक विचार तयार म्हणून वाचन नेहमीच करावे हीच खरी प्रेरणा आजच्या घेण्याची गरज आहे असे उदगार अध्यक्ष डॉ. पत्रिकर यांनी केले .

डॉ, ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांना अभिप्रेत असलेला समाज घडविणे आवश्यक आहे असे श्री . वड्सकर यांनी सांगितले, सामाजिक विकास होणे हिच . ऐ. पी. जे.अब्दुल कलाम खरी श्राद्धजली ठरेल असे सुनील पाटिल यांनी म्हटले ,तर व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे नेहमीच वाचन करावे असे श्री प्रमोद अनेराव यांनी प्रतिपादित केले ,या कार्यक्रमाची प्रस्तावना खुमेन्द्र बोपचे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले तर सूत्र संचालन जयंत आठवले कार्यवाह सार्वजनिक वाचनालय, भंडारा यांनी केले तर आभार रोशन उरकुड़े यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जवळपास २०० ग्रंथलायचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात वाचक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.