जिल्ह्यात ४० हजार वर्षापुर्वीची गुफा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या खोºयांमध्ये सुमारे ४० हजार वर्षांपुर्वीच्या प्रागैतिहासिक गुफा शोधण्यात यश मिळविले आहे. अशी गुफा बावनथडी नदीच्या काठावर सापडली असून येथे प्रागैतिहासिक काळातील चित्र आणि दगडी शस्त्रही मिळाल्याचे समजते. हे शोधकार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाष शाहू यांच्या मार्गदर्शनात पीएचडी करणाºया विवेक राऊत, शांतनू इंगळे आणि प्रवीण मेश्राम यांच्या चमूने केले.

भंडारा जिल्ह्याची सीमा उत्तरेकडे मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाटाला लागून आहे. बालाघाट परिसरात यापुर्वी प्रागैतिहासिक गुफा सापडल्या आहेत. या गुफांमध्ये ३२ भित्तीचित्र सापडले. यामध्ये मानवी चित्र ते पशुचित्र यांचा समावेश आहे. लालसर राखडी गडद आणि पांढरा रंग यांचा चित्रे काढण्यासाठी वापर करण्यात आला आहे. गुफेमधील काही चित्र इसवी सन पूर्व सुमारे ४० हजार वर्षांपुर्वीची (अप्पर पॅलोलिथिक) तर काही चित्रे इसवी सन पूर्व १० हजार (मेसोलिथिक) काळातील आहेत. तसेच पाषाणयुगीन काही दगडी हत्यारेही येथे सापडली. विदर्भातील प्रागैतिहासिक काळ समजण्यासाठी या स्थळांचे संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करावे लागेल, असे पुरातत्त्व विभाग प्रमुख डॉ. प्रभाष शाहू यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *