स्वत: चे पगार थांबवा, पण शेतकºयांचे पैसे द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ध्यान विक्री करणाºया अनेक शेतकºयांची पैसे मागील काही महिन्यांपासून दिले गेले नाहीत. शेतकºयांची चूक नसताना विनाकारण त्यांची अडवणूक करून पैसे थांबवू नका. स्वत:चे पगार थांबवा पण शेतकºयांना त्यांच्या घामाचे पैसे ताबडतोब द्या, अशा स्पष्ट शब्दात खासदार सुनील मेंढे यांनी पणन विभागाच्या अधिकाºयांना खडसावले. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे विविध विषयांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक विषया संदर्भात खा सुनील मेंढे यांनी आढावा घेतला. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील शेतकºयांच्या पैशाचा विषय निघाल्यानंतर खासदार चांगले आक्रमक झाले. अनेक केंद्रांच्या माध्यमातून धान विक्री करणाºया बहुसंख्य शेतकºयांची चुका-याचे पैसे अजून पर्यंत देण्यात आलेले नाही. वारंवार सूचना करूनही पैसे शेतकºयांना दिले जात नसल्याने खासदारांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि पणन विभागाचे प्रबंध संचालक यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीतूनच प्रबंध संचालकांना भ्रमणध्वनीवर यासंदर्भात जाब विचारला. शेतकºयांचे पैसे अडविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांची चूक नसताना त्यांचे पैसे थांबवू नका.

प्रसंगी स्वत:चे पगार थांबवून शेतकºयांना पैसे द्या अशा कडक शब्दात खासदारांनी यावेळी अधिकाºयांची कान उघाडणी केली. जिल्हाधिकाºयांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकºयांचे पैसे कसे देता येतील यासंदर्भात निर्णय घ्यावा असे निर्देशही खासदारांनी जिल्हाधिकाºयांना दिले. या सोबतच भंडारा जिल्ह्याच्या मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामा संदर्भात असलेल्या अडचणी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने संदर्भात असलेल्या अडचणींवरही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील बºयााच शेतकºयांचे हप्ते मिळालेले नाही. ही योजना महसूल विभागाकडे असताना शेतकºयांच्या बाबतीत टाळाटाळ केली गेली. महसूल विभागाकडून ही योजना आता कृषी विभागाकडे हस्तांतरित झाली असून शेतकºयांना होणारा त्रास आणि मिळत नसलेल्या हप्त्या संदर्भात कारणे शोधून अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी जिल्हाधिकाºयांना यावेळी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *