खमारी येथे मतदान केंद्रावर ६ वाजेपर्यंत गर्दी

भंडारा :- तालुक्यातील खमारी बुटी येथील ग्राम पंचायत निवडणूक-२०२२ ची निवडून मोठ्या उत्साहात घेण्यात आली. त्यावेळी तिन्ही मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदान केंद्रावर अमाप गर्दी पाहुन तसेच गोंगाट झाल्याने आंबेडकर वार्ड क्रमांक १ मध्ये कार्यरत कर्मचारी ओमप्रकाश घरत याची प्रकृती बिघडल्याने पोलीस विभागाच्या जागृत कर्मचाºयांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सि. के. वाहाने व आरोग्य सेविका अल्फिया पठाण यांनी उपचार केला. काही वेळानंतर घरत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. मतदानाचा अधिकार बजावण्याकरिता गावातील म्हाताºया महिला व पुरूषांना उचलून मतदान केंद्रावर आणण्यात आले होते. तिन्ही मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत गर्दी होती. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस विभागाच्या नियोजनबध्द प्रयत्नामुळे आंबेडकर वार्ड क्रमांक १ च्या मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने मतदान उशिरा पर्यंत चाचले होते. निवडणूकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले असून यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *