शासकीय कामात अडथळा निर्माण करणाºयास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : न्यायालयातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयाला अश्लिल शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपीला भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षे सश्रम कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. रोशन गोपीचंद कोचे वय ४० वर्षे रा. भागडी त.लाखांदुर जि.भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ एप्रिल २०१९ रोजी पोलीस नायक नितीनकुमार वसंत साठवने हे नेहमी प्रमाणे न्यायालयात आपले कर्तव्यावर हजर असतांना न्यायालयात वकिलकी करणारे रोशन गोपीचंद कोचे याने अंदाजे ४ वाजेच्या सुमारास न्यायालयातील सरकारी महिला वकील व लिपीक पुरुष यांचे सोबत झगडा-भांडण करुन अश्लिल शिवीगाळ करीत फिर्यादीस मारहाण केल्याने आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन लाखांदुर येथे अप ८७/ १९ कलम ३५३, २९४, ३२३, ५०६ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता सदर सहायक पोलीस निरीक्षक के. के. गेडाम यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात केली. तपासाअंती आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम ३५३,२९४, ३२३, ५०६ भांदवी या आरोपाखाली खटला क्रमांक १/१९ देवुन भंडारा अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश येथे दाखल केले. सदर गुन्हयाची सुनावणी प्रमुखजिल्हासत्र न्यायाधीशा श्री. आर. जी. अस्मर यांचे न्यायालयीन कक्षात चालविण्यात आली. प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता रमाकांत खत्री यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयाने पुराव्यांचे आधारे आरोपी नामे रोशन गोपीचंद कोचे याला कलम २९४, ३२३, ३३२, ३५३, ५०६ भांदवी मध्ये १ वर्षे सश्रम कारावास १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली . सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईष्वर कातकडे, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गुह) विजय डोळस,लाखांदुर पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शनाात सहायक फौजदार आडे यांनी पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *