नगर परिषद भंडारा येथे मेरी माटी मेरा देश अंतर्गत विविध उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद भंडाराच्या वतीने आज दि. १४ ५आॅगस्ट २०२३ रोजी “मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरो को वंदन” अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने म्हाडा कॉलनी येथील उद्यानाला ‘शहीद चंद्रशेखर भोंडे’ हे नामकरण करण्यात आले सदर कार्यक्रमात शहिद चंद्रशेखर भोंडे यांची पत्नी श्रीमती किरण भोंडे यांनी त्यांच्या पतीवर कविता सादर केली. त्याक्षणी उपस्थित समुदायाचे डोळे पाणावले. त्यानंतर नगर परिषद भंडारा येथील सभागृहात विरोका वंदन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शहीद पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्या कुटुंबीयांचा तसेच सैन्य दलातील माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. त्यात माजी सैनिकांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी देशप्रेमाच्या वातावरणाची निर्मिती झाली.

सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे व भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक लोहित मतानी, विनोद जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा व मुकेश साकुरे अध्यक्ष एक्स सर्विसमैन वॉरीयर्स, फाऊंडेशन भंडारा व सैन्य दलातील माजी सैनिक तसेच पोलिस दलातील शहीद कुटुंबियांचे नातेवाईक व भंडारा शहरातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर नगर परिषद गांधी विद्यालय येथे शीला फलकाचे अनावरण मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांच्या द्वारे करण्यात आले. यामुळे पुढील पिढीला सतत प्रेरणा व स्फुर्ती मिळेल. कार्यक्रमाचे संचालन मुकेश कापसे, सहा. नगर रचनाकार व प्रवीण पडोळे, शहर पकल्प व्यवस्थापक यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी नगर अभियंता श्रीमती धनश्री वंजारी, उपमुख्याधिकारी अश्विनी चव्हान, गणेश मुळे, अनिकेत दुर्गवळे व नगर परिषदेतील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *