भंडारा कोतवाल भरती प्रकरण विधानसभेत गाजले

रवी धोतरे / भंडारा पत्रिका भंडारा : तालुक्यातील ८ मे २०२३ कोतवाल भरती प्रकरणी झालेल्या घोटाळा प्रकरण सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. या प्रकरणाची आयुक्त व वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाही करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी विधानसभेत उत्तरादरम्यान आ. भोंडेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भंडारा जिल्हयात ८ मे २०२३ रोजी कोतवाल भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांनी आपल्या मर्जीतील अधिकारी नेमून केली होती. सदर भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा सुरु असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या भ्रमणध्वनित लेखी परीक्षेसंबंधी स्क्रीनशॉट दिसून आले. त्यामुळे लिपिक व अन्य ८ यांच्यावर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली.

जिल्हाधिकारी निवासस्थानामधील रोजंदारीवर काम करणाºया मुलांना १०० पैकी १०० गुण मिळाल्याने हा घोळ जिल्हाधिकारी कार्यालयातून झाला असल्याने त्यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी विधानसभेत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी रेटून धरली. या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री यांनी सदर प्रकरणाची नागपूर बिभागीय आयुक्त व सचिव दर्जाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे विधानसभेत सांगितले. याच प्रकरणात तत्कालीन तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल केला होता म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाही होणे आणि वरिष्ठ अधिकारी मोकळे राहणे याही बाबत आ. भोंडेकर यांनी उपप्रश्न विचारला असता दोषारोप सिद्ध होई पर्यंत संबंधित अधिकाºयांवर कारवाही सबंधी विचार करण्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *