हत्तीच्या कळपावर ड्रोनसह पथकाची नजर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : गेल्या आठवड्या भरापासून तालुक्यातील अनेक गावात हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, ड्रोन कॅमेराद्वारे हत्तीच्या कळपाची माहिती ठेवली जात असून हत्तीच्या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालमधून तज्ञाची टीमही पाचारण केली आहे. गेल्यावर्षी आॅक्टोंबर २०२२ मध्ये छत्तीसगड, गडचिरोलीच्या जंगलातून जिल्ह्यात प्रवेश केला होता.

दिवाळीच्या दोन दिवस आधी हत्तीच्या कळपाने नागंणडोह येथील वस्ती उध्वस्त केली. तसेच हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकºयाचा ही मृत्यू झाला होता. सोबतच कळपाने कोट्यावधी रुपयाच्या पिकाचे व वन विभागाच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. त्यानंतर हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने गेला होता. मात्र जुलै २०२३ मध्ये पुन्हा गोंदिया जिल्ह्यात परतला. काही दिवस नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील जंगलात राहिल्यानंतर हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने गेला. पुन्हा चार महिन्यांनी ११ डिसेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अर्जुनी मोरगाव तालुक्यातीलराजोली, भरनोली, बाराभाटी व रामघाट येथील शेतपिके व घरादांराचे नुकसान केले. पीक व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी वन विभागाने या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालमधून हत्ती नियंत्रण तज्ञांना पाचारण केले आहे. आजघडीला तालुक्यातील कालीमाती, बोडदे व कवठा वनपरिक्षेत्रात हत्तीचा कळप असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *