गोंदिया जिल्ह्याातील कर्मचाºयांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्या

प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनानुसार जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या समस्या बाबत खासदार सुनील मेंढे यांनी जि.प. गोंदिया येथे आयोजित शिक्षक समस्या निवारण सभेत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सदर सभेत गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाºयांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच इतर प्रलंबित समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समस्या निवारण सभा संपन्न करण्यात आली. यावेळी खासदारांनी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनास आदेश दिले.

यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक गजभिये, शिक्षणाधिकारी माध्यमिक शेख, मुख्य वित्त व लेखा अधिकारी खोटेरे, सर्व खाते प्रमुख तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी सहकार्य करणारे जि.प.चे गटनेते लायकराम भेंडारकर उपस्थित होते. निवेदनानुसार गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व शिक्षकेत्तर, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना सरसकट एकस्तर लागू करून थकबाकी अदा करणे, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी मागणी केलेल्या रकमेचा पाठपुरावा करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे चार वर्षापासून रखडलेले चटोपाध्याय व निवड श्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, रोस्टर मंजूर करून शिक्षकांच्या पदोन्नती करणे, डीसीपीएस बांधवांचे सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते प्रदान करणे, सर्व शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात देण्यात यावे, ओबीसीसह सर्व संवर्गाच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रे मागवून विविध शिष्यवृत्ती मंजूर करणे आदी मागण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर (ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, लिपिक व चतुर्थ श्रेणी) कर्मचाºयांच्या प्रलंबित समस्या करीता समस्या निवारण सभेचे आयोजन केल्याबद्दल खासदार सुनील मेंढे व जिल्हा परिषदेचे गटनेते लायकराम भेंडारकर यांचे शिक्षक संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या सभेला महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, शिक्षक नेते वीरेंद्र कटरे, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा सरचिटणीस अरविंद ऊके, तालुका अध्यक्ष कैलास हांडगे व इतरही शिक्षक संघ पदाधिकारी हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.