ओम कटरे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिरेखणी येथील युवा कार्यकर्ता ओम कटरे यांची गोंदिया जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीने जिल्ह्यातील भाजपा युवक कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. तिरोडा तालुक्यात २००५ पासून निरंतर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. राष्टÑीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले ओम कटरे यांचा बजरंग दल कार्यकर्ता ते युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असा प्रवास राहिलेला आहे. २००७ ते २०१० पर्यंत बजरंग दलचे तालुका विस्तारक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सक्रिय रा-ि हलेले आहेत. २०१३ व २०१६ ला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दोनदा जबाबदारी पार पाडली. व उपाध्यक्ष असतानी केलेल्या पक्ष कार्याच्या जोरावर त्यांची २०१९ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष असतानी संपूर्ण जिल्ह्यात सतत प्रवास ,बैठका,युवा मोर्चा बांधणी ह्या सर्व कार्यामुळे जिल्ह्यातील युवक एक आदर्श नेतृत्व म्हणून श्री. ओम कटरे यांच्याकडे बघत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार व आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या द्वारा आयोजित सिएम चषक महोत्सव,मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार व खासदार सूनील मेंढे द्वारा आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव, विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानी सामान्य परिवारातून निघालेला नेतृत्व राजकारणातील भारतीय जनता पक्षाचा भविष्यातील चेहरा म्हणून समोर येत आहे.जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची पावती म्हणून पक्ष श्रेष्ठींनी २०२३ मध्ये पुन्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. पुन:श्च नियुक्त केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राहुलजी लोणीकर,संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर,बाळा अंजणकर, खा.सूनिलजी मेंढे ,माजी मंत्री परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, माजी मंत्री राजकुमारजी बडोले, हेमंत पटले,पंकज रहांगडाले संजय कुलकर्णी ,केशवराव मानकर,तथा सर्व पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले.भारतीय जनता पक्षातर्फे ओम कटरे यांच्या पूनर्नियुक्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *