तालुका भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा प्रारंभ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोंबर रोजी दरम्यान राष्ट्रनेता व राष्ट्रपिता ” सेवा पंधरवडा ” संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येणार असून त्यात अनेक विविध जनहिताचे उपक्रम राबविले जाणार आहे .भा .ज .पा . लाखांदूरच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आले . यात सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले . वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . नंतर दिघोरी मोठी जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र दीघोरी . केंद्र बारवा . सरांडी बु. कुठे गाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले .

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी निमंत्रित वामन बेद्रे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अँड. वसंता एंचीलवार,भाजपा जिल्हा महामंत्री विनोद ठाकरे,भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान,माजी जि .प . सदस्य नरेश खरकाटे,कांचन गहाणे, जि. प . सदस्य प्रियक बोरकर,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तुळशीदास बूरुडे,नगरपंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख,पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम ठाकरे,मधुर उके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डेलीश ठाकरे,तेजराम दिवटे , शिवाजी देशकर,उमेश देशमुख, दिलीप ब्राह्मणकर,विजय खरकाटे,भारत मेहंदळे. सरपंच हितेश देशमुख,चंद्रशेखर खेडीकर, भास्कर अलोने,दत्तराज दोणाडकर,गिरीश भागडकर,नगरपंचायत नगरसेविका वेणु कोटरंगे ,नीलम हुमने ,सोफिया पठाण,प्रिया धाकडे, विद्या गराडे,नगरसेवक रिजवान पठाण,सुरेश नागपुरे . गोपाल तरेकर . आकाश दखणे . जितू ढोरे ,प्रकाश राऊत व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *